Home राजकीय ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते जिल्हा चिटणीस विजय महाजन यांचा सन्मान

ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते जिल्हा चिटणीस विजय महाजन यांचा सन्मान

0
198


रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर येथील कार्यक्रमात ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते जिल्हा चिटणीस विजय महाजन यांचा सन्मान करण्यात आला.

सेवा पंधरवडा निमित्त जामनेर येथे आयोजित बैठकीत भारतीय जनता पार्टीतर्फे उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडला. या बैठकीला महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आमदार राजुमामा भोळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर यांच्यासह भाजपचे जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी जिल्हा भाजपा चिटणीस म्हणून विजय महाजन यांची निवड झाल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते युक्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा पातळीवरील जबाबदारी स्विकारताना त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

भाजपच्या संघटनात्मक कार्यात नवीन उर्जा व बळकटी मिळावी, तसेच कार्यकर्त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने केलेल्या या नियुक्तीचे सर्व स्तरावर स्वागत करण्यात आले.


Protected Content

Play sound