धरणगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सोनवद जवळील अहिरे बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी व विका सोसायटी चेअरमन शरद पंढरीनाथ पाटील (वय ५५) यांचे ५ सप्टेंबर रोजी रात्री ७.५० मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पाश्च्यात, आई, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार होय. त्यांची अंत्ययात्रा दि.६ रोजी सकाळी १० वाजता अहिरे बुद्रुक येथील राहत्या घरून निघणार आहे. ते पत्रकार विजय शरद पाटील यांचे वडील होत. शरद पाटील हे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि सामाजिक कार्यामुळे परिसरात लोकप्रिय होते. शेतीत नवनवीन प्रयोग करून त्यांनी एक आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने अहिरे बुद्रुक आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

शरद पंढरीनाथ पाटील यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.



