जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे राहणाऱ्या एका २३ वर्षीय विवाहित महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंजना शिवराम मोरे (वय २३) रा. व असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पती शिवराम मोरे यांच्यासोबत वसंतवाडी येथे वास्तव्यास होत्या. २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता अंजना मोरे यांनी अज्ञात कारणावरून विषारी औषध सेवन केले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या पतीने त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.

अंजना मोरे यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



