Home Cities जळगाव गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या साम्राज्य गणरायास भक्तीभावात निरोप 

गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या साम्राज्य गणरायास भक्तीभावात निरोप 

0
144

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावमधील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आलेल्या साम्राज्य गणरायास आज पाचव्या दिवशी भक्तीभावात, पारंपरिक पद्धतीने आणि सांस्कृतिक रंगांनी सजलेल्या वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश पूजनापासून ते विसर्जनापर्यंत संपूर्ण कार्यक्रमात अध्यात्म, संस्कृती आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

साम्राज्य गणरायाचे पूजन संस्थाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. उल्हास पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, प्राचार्य विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील, नर्सिंग कॉलेजचे संचालक शिवानंद बिरादर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गणरायाच्या विसर्जनपूर्वी परिसरातून ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक गीते, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांचे मन जिंकले.

त्यानंतर तापी नदीच्या तीरावर संपूर्ण वातावरण भक्तीमय असताना श्री गणरायास निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात विसर्जन सोहळा संपन्न झाला.


Protected Content

Play sound