Home क्राईम अवैध उत्खनन रोखताना तलाठ्यांना धक्काबुक्की; वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

अवैध उत्खनन रोखताना तलाठ्यांना धक्काबुक्की; वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

0
117

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा तलावाच्या खालील बाजूला अवैधपणे मुरूम उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना महसूल आणि पोलीस पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शनीवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता घडली आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

अवैध उत्खननाचा पर्दाफाश
वरणगाव पोलीस स्टेशन आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाला ओझरखेडा तलावाजवळ अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकाने ३० ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता घटनास्थळी धाव घेतली असता, तिथे एका पिवळ्या रंगाच्या जेसीबी (क्रमांक MH-३७-L-७९४९) च्या सहाय्याने मुरूम उत्खनन करून तो ट्रॅक्टरमध्ये भरला जात असल्याचे आढळून आले. कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना शासनाच्या जागेतून हा मुरूम काढला जात होता.

तलाठी आणि पोलिसांवर हल्ला
पथकाने जेसीबी चालकाला थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने पथकातील तलाठी उद्धव बाभुळकर आणि रोशन मनोहर कापसे यांच्यासोबत झटापट करत त्यांना धक्काबुक्की केली. यानंतर आरोपीने जेसीबी मशीन चालू करून अंधाराचा फायदा घेऊन ती मशीन जंगलात घेऊन पळून गेला. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने तलाठी गायत्री सुभाष राठोड (वय २९) यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नितीन डांबरे करत आहेत.


Protected Content

Play sound