Home Cities यावल  आ. अमोल जावळेंची किनगाव येथील इंग्लिश मिडीयम स्कूलला सदिच्छा भेट 

 आ. अमोल जावळेंची किनगाव येथील इंग्लिश मिडीयम स्कूलला सदिच्छा भेट 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर यावत विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी यावल तालुक्यातील किनगाव डोणगाव मार्गावर वसलेल्या इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलला दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी सदिच्छा भेट दिली. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेच्या भेटीदरम्यान, आमदार जावळे यांनी संस्थेच्या कार्याची स्तुती केली आणि आपल्या वडिलांचे या संस्थेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा दिला.

या भेटीप्रसंगी आमदार अमोल जावळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव व स्व. केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील तसेच प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील यांनी या स्वागताचे आयोजन केले होते. उपस्थितांचे आमदारांच्या या सदिच्छा भेटीबद्दल मनापासून स्वागत करण्यात आले.

स्व. हरिभाऊ माधव जावळे – जे स्वतः माजी खासदार होते – यांचे विजयकुमार पाटील यांच्याशी पारीवारिक व जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याच नात्याचा मान राखत आमदार अमोल जावळे यांनी पाटील कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली आणि इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले.

या भेटीच्या वेळी अरुण पाटील, राहुल पाटील, पांडुरंग पाटील तसेच परिसरातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या संधीने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शैक्षणिक पातळीवर होत असलेल्या प्रगतीचे आमदारांनी कौतुक करत शिक्षण व्यवस्थेसोबत अधिक मजबुतीने जोडले जाण्याचा विश्वास व्यक्त केला.


Protected Content

Play sound