Home क्राईम विहिरीत पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू !

विहिरीत पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू !


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील खिरोदा येथील ३५ वर्षीय तरूण हा शेतातील विहिरीत तोल जावून पडल्याने पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश लक्ष्मण महाजन वय ३५ रा. खिरोदा ता. रावेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

योगेश महाजन हा गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी त्याच्या खिरोदा शिवरातील शेतात गेलेला होता. दरम्यान सकाळी विहीरीजवळ काम करत असतांना अचानक त्याचा तोल गेला आणि विहिरीत पडला. दरम्यान त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. हा प्रकार त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला बाहेर काढून रावेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषीत केले. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ सिकंदर तडवी हे करीत आहे.


Protected Content

Play sound