Home क्राईम जबरी चोरीतील फरार आरोपी अखेर जेरबंद ; जळगाव एलसीबीची कारवाई !

जबरी चोरीतील फरार आरोपी अखेर जेरबंद ; जळगाव एलसीबीची कारवाई !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी, असिफ बेग असलम बेग उर्फ बाबा काल्या, हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जबरी चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांचे पथक आरोपीच्या शोधात होते.

गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जबरी चोरीतील फरार आरोपी असिफ बेग हा फैजपूर येथील ‘हॉटस्पॉट’ हॉटेलमध्ये आला आहे. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ फैजपूर पोलीस स्टेशनच्या मदतीने हॉटेलवर छापा टाकला आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद झाला.

यशात अनेक अधिकाऱ्यांचा सहभाग
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, मैमुद्दीन सय्यद, रवी नरवाडे यांच्यासह पोलीस अंमलदार गोपाळ गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, आणि जुबेर शेख यांचा समावेश होता. ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Protected Content

Play sound