जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचलेला असतानाच, जामनेर येथे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात गणपती बाप्पाचे विधीवत पूजन करून स्थापना करण्यात आली. गणरायाच्या मंगलमय आगमनाने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी पारंपरिक पद्धतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विधिवत पूजा, मंत्रोच्चार, आरती आणि प्रसाद वितरणासह कार्यक्रम अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडला. गणपती बाप्पाच्या मूर्तीची सजावट आकर्षक व देखणी करण्यात आली होती. गणेश मूर्तीसमोर लावलेली आरास व विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

स्थापनेच्या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये भाजपा जेष्ठ नेते चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, अतिश झाल्टे, प्रा. शरद पाटील, डॉ. प्रशांत भोंडे, दीपक तायडे, नवल पाटील, रवींद्र झाल्टे, डॉ. संजीव पाटील, कैलास नरवाडे, प्रल्हाद सोनवणे, बाबुराव हिवराळे, ज्ञानेश्वर शिंदे, रवींद्र सूर्यवंशी, प्रमोद सोनवणे, सुहास पाटील, भाईदास चव्हाण, विजय शिरसाठ, डॉ. पांडुरंग आल्हाट यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणरायाच्या चरणी सर्वांनी आपापले संकल्प मांडत राज्य व देशाच्या सुख, समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालयात दरवर्षी गणेशोत्सव साजरा होतो. यंदा उत्सवाला अधिकच भव्यता लाभली असून, श्रद्धा, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले. उत्सवाच्या निमित्ताने परिसरात स्वच्छता, प्रदूषणमुक्ती व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.



