Home Cities जळगाव तुषार सैंदाणे यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश

तुषार सैंदाणे यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी श्रीकृष्णलीला बहुउद्देशीय संस्था जळगावचे तुषार सैंदाणे यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

तुषार सैंदाणे हे भारतीय आदिवासी कोळी सेनेच्या माध्यमातून समाजकार्य करत असून शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दिगंबर सोनवणे, नरेंद्र सोनवणे, सागर सोनवणे, राहुल बाविसकर, अक्षय शिंपी, विशाल सापकळे, किशोर सालुंके, गजानन कोळी, हेमंत पाटील आणि हितेश सोनवणे यांनीदेखील भाजपात प्रवेश केला.

या प्रसंगी तुषार सैंदाणे म्हणाले, “भाजप हा विकासाभिमुख पक्ष असून आदिवासी व कोळी समाजासह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणारा पक्ष आहे. माझ्या सामाजिक कार्याला आता या व्यासपीठावरून आणखी गती मिळेल.”

पक्षप्रवेशानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष करत सर्वांचे स्वागत केले. यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound