Home Cities जळगाव राजमुद्रा ग्रुप गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन नांदुरकर तर सचिव यश पाटील

राजमुद्रा ग्रुप गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन नांदुरकर तर सचिव यश पाटील


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नशिराबाद येथील राजमुद्रा ग्रुप गणेश मित्र मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाचे यंदाचे वे 5 वर्ष आहे. या वर्षासाठी अध्यक्षपदी नितीन नांदुरकर आणि सचिवपदी यश पाटील यांची निवड करण्यात आली.

यंदाच्या वर्षी राजमुद्रा ग्रुप गणेश मंडळाने स्वामी समर्थ यांच्या रूपातील 10 फूट उंचीची गणेश मुर्ती असणार आहे. गणेशोत्सव काळात गणेशभक्तांसाठी आध्यात्मिक, पर्यावरणपूरक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दहा दिवसात विशेष अतिथी म्हणून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी, डी वाय एस पी संदीप गावित यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत महाआरतीचा कार्यक्रमही पार पडणार आहे.

यंदा साकारणार श्री स्वामी समर्थांच्या रूपात देखावा
नशिराबाद येथील फ्रूट सेल चौक मागे असलेल्या राजमुद्रा ग्रुप गणेश मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या रूपातील गणेश मूर्ती विराजमान करण्यात येणार आहे तर मंडळ परिसरातच स्वामींच्या जीवनपटावर विविध आरास करण्यात येणार आहे.

मंडळ कार्यकारिणी अशी
अध्यक्ष नितीन नांदुरकर, उपाध्यक्ष रितेश टापरे, सचिव यश पाटील, सहसचिव योगेश बाविस्कर, संकेत कावळे,किरण शिवरामे, मयूर शिवरामे, निखिल महाजन,तेजस यवकार, अक्षय घुमरे, धनराज भावसार,संतोष खारे,भरत राजपूत,यश भावसार यांच्यासह सदस्यांचा समावेश आहे


Protected Content

Play sound