मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील मौजे घोडसगाव येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या विरोध करत ग्रामीण मराठातर्फे आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून, तालुका कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, घटना ही अत्यंत दुदैवी असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्यामुळे आरोपी सुरेश श्रीराम इंगळे ह्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. तसेच हे प्रकरण जलद गतीने न्यायालयामध्ये चालवून आरोपीस शिक्षा देण्यात यावी व अशा वारंवार होणाऱ्या अमानुष घटनांवर कायद्याचा कठोर वचक बसून कायमचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी मुक्ताईनगराती ग्रामीण मराठातर्फे करण्यात आली आहे. तसेच अशा निंदनीय घटनेचा विरोध करत शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्यात आली, व्यापारी संघटनेने तसेच ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला आहे.