Home क्राईम दुचाकीच्या भीषण अपघातात दोघे भाऊ गंभीर जखमी

दुचाकीच्या भीषण अपघातात दोघे भाऊ गंभीर जखमी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा गावानजीकच्या कुरकुरे नाल्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली असून, या प्रकरणी शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चिरागदीन शेख अकबर (वय ३५, रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) हे त्यांचा भाऊ सबदर शेख अकबर यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ एयू ०२४४) ने गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वावडदा गावजवळील कुरकुरे नाल्याजवळून जात होते. त्याचवेळी, समोरून वेगाने येणाऱ्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईडी ६८७०) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर आदळले आणि त्यात चिरागदीन व सबदर हे दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर तातडीने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMCH) दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमी चिरागदीन शेख अकबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दुसऱ्या दुचाकीवरील चालक किशोर गोकुळ चौधरी (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे हे करत आहेत.


Protected Content

Play sound