Home Cities जामनेर नेरी परिसरात अतिवृष्टी : मिक्सरसह बांधकाम साहित्य गेले वाहून !

नेरी परिसरात अतिवृष्टी : मिक्सरसह बांधकाम साहित्य गेले वाहून !


जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नेरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने नाल्यास पूर आला.

जळगाव जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. शनिवारी मध्यरात्री धरणगाव तालुक्यात दोन ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर रविवारी, १७ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास जामनेर तालुक्यातील नेरी गावात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे नेरी गावाजवळील वाघूर नदीला प्रचंड मोठा पूर आला. या अचानक आलेल्या पुरामुळे नदीजवळ उभी असलेली एक ट्रॅक्टर आणि काँक्रीट मिक्सर ही दोन्ही वाहने वाहून गेली.

​या घटनेमुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले होते. मात्र, बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी प्लेट्स, असारी आणि इतर साहित्यही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे, अशी माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने जीवितहानी टळली असली तरी, यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


Protected Content

Play sound