Home Cities जळगाव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जळगावात दाखल : आज विविध कार्यक्रमांना उपस्थिती !

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जळगावात दाखल : आज विविध कार्यक्रमांना उपस्थिती !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल रात्री जळगावात आगमन झाले असून आज ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत.

काल रात्री दहाच्या सुमारास जळगाव विमानतळावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आगमन झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह अन्य नेत्यांची याप्रसंगी उपस्थिती होती. पवार यांनी काल रात्री जैन हिल्स येथे मुक्काम केला. दरम्यान, त्यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्यांसोबत चर्चा देखील केली.

आज सकाळपासून अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी ते चिंचोली येथील मेडिकल हबची पाहणी करतील. यानंतर ते राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनच्या नवीन इमारतीचे उदघाटन होईल. याप्रसंगी ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. तर नंतर ते शिवतीर्थ मैदानावर आयोजीत पक्षाच्या समृध्द खान्देश मेळाव्याला उपस्थिती देणार आहेत.


Protected Content

Play sound