Home Cities जळगाव गिरणा नदीतून शेतकऱ्यांना पाणी द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

गिरणा नदीतून शेतकऱ्यांना पाणी द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

0
123

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणा धरणातून चाळीसगाव एमआयडीसीला पाणी न देता, धरणगाव, एरंडोल आणि पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गिरणा नदीत आवर्तन सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने केली आहे. याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या चाळीसगाव एमआयडीसीला पाणी दिल्यास शेतीसाठी पाण्याची कमतरता भासू शकते. त्याऐवजी, गिरणा नदीत आवर्तन सोडल्यास धरणगाव, एरंडोल आणि पाचोरा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फायदा होईल. यामुळे पाण्याची योग्य विभागणी होऊन शेती सिंचनाखाली येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे.

यावेळी पक्षाच्या माजी युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound