बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील येवती गावात शेतातील वहिवाटीच्या किरकोळ कारणावरून एका तरुणासह त्याच्या वडिलांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना ५ ऑगस्ट रोजी घडली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात तब्बल १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येवती येथील रहिवासी अफसर खान अन्वर खान पठाण (वय ३०) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अफसर खान हे घरी असताना, त्यांच्याच गावातील गयास खान यावर खान पठाण याच्यासह त्याच्या नातेवाईकांनी अफसर खान आणि त्यांचे वडील अन्वर खान पठाण यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत हे दोन्ही बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर अफसर खान अन्वर खान पठाण यांनी शनिवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मारहाण करणाऱ्यांमध्ये गयास खान यावर खान पठाण, भिकन खान रोशन खान पठाण, रोशन खान यावर खान पठाण, गुलाब खान दिलावर खान पठाण, रईस खान यावर खान पठाण, चांदखान यावर खान पठाण, अनीस खान अजीज खान पठाण, शेरखान अलखान पठाण, युसूफ खान हाजेखान पठाण, इकबाल खान दिलावर पठाण, इजाज खान इकबाल खान पठाण, सईदाबी यावर खान, रसीदाबी खाजेखान पठाण, आसामाबी गयास खान पठाण, सज्जोबी चांदखान पठाण आणि सरताजबी इकबाल खान पठाण (सर्व रा. येवती ता. बोदवड) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी या सर्व १६ जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ हे करत आहेत. शेतीच्या वादातून झालेल्या या गंभीर मारहाणीमुळे येवती गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



