Home क्राईम तलवारीने दहशत माजवणाऱ्या दोघांवर कारवाई; भुसावळात कारवाई

तलवारीने दहशत माजवणाऱ्या दोघांवर कारवाई; भुसावळात कारवाई


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गोकुळ टी परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांवर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक लोखंडी तलवार जप्त केली असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गोकुळ टी परिसरात केवल अनिल टाक (वय ३०) आणि शिवा जगदीश पथरोड (वय ३०, दोघे रा. भुसावळ) हे अवैधपणे लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक वाघ यांनी तात्काळ आपल्या पथकाला कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार, पोलिसांनी गोकुळ टी परिसरात कारवाई करत संशयित आरोपी केवल टाक आणि शिवा पथरोड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत सोनार हे करत आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय असल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे.


Protected Content

Play sound