अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील समर्थ नगरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने असा एकुण ८० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील पुनम अनील गव्हाणे रा. समर्थ नगर, अमळनेर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घुसून घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकुण ८० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेने सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शनिवारी ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहे.




