Home क्राईम फायरिंग करणारा जेरबंद; रामानंद नगर पोलीसांची कारवाई

फायरिंग करणारा जेरबंद; रामानंद नगर पोलीसांची कारवाई


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात दहशत पसरवण्यासाठी गावठी कट्ट्यातून फायर करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला रामानंद नगर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टाही जप्त करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली. रामेश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या दीपक लक्ष्मण तरटे (रा. रामेश्वर कॉलनी) याने सरला राजदीप सपकाळे यांच्या घरात घुसून गावठी कट्ट्यातून फायर केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर रामानंद नगर पोलिसांनी नुसार गुन्हा दाखल केला.

आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासणीच्या आधारे पोलिसांनी रामेश्वर कॉलनी परिसरात सापळा रचला. या सापळ्यात आरोपी दीपक तरटे पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला सुमारे १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. दीपक तरटे हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोउपनि सचिन रणशेवरे करत आहेत.


Protected Content

Play sound