Home टेक्नोलॉजी ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट

ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट


बंगळुरू – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला तीन महिने पूर्ण झाले असताना, या मोहिमेबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि अधिकृत माहिती समोर आली आहे. भारताचे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी थेट सांगितले की, या मोहिमेदरम्यान केवळ एका S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानची तब्बल पाच लढाऊ विमाने आणि एक अवाक्स विमान पाडले. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे संपूर्ण संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बंगळुरूमध्ये आयोजित एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे व्याख्यानमालेत बोलताना एअर चीफ सिंह यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारतीय हवाई दलाच्या S-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिमने पाकिस्तानकडून भारताच्या सीमेजवळ पाठवण्यात आलेली विमाने अत्यंत अचूकतेने लक्ष्य करत नष्ट केली. विशेष म्हणजे, यामधील AEW&C (एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल) विमानाला ३०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्य करून पाडण्यात आलं, हे भारताच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील प्रगतीचं उत्तम उदाहरण ठरलं.

हा खुलासा करताना सिंह यांनी म्हटलं की, S-400 ही प्रणाली हवाई दलाच्या ताफ्यात अलीकडेच समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र, अत्यल्प कालावधीतच तिने ऑपरेशन सिंदूरमध्ये गेमचेंजर भूमिका बजावली. पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसखोरी करत लांब पल्ल्याचे ग्लाईड बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र S-400 च्या उपस्थितीमुळे हे शक्य झालं नाही आणि त्यांचे विमाने हवेतच निष्प्रभ झाली.

हवाईदलप्रमुखांनी पहिल्यांदाच अधिकृतरित्या ऑपरेशन सिंदूरबाबतची आकडेवारी जाहीर केली. त्यांनी स्पष्ट केलं की, हल्ल्याआधीच सर्व लक्ष्य निश्चित करण्यात आली होती. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांची अचूक ओळख पटवून, अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि इमेज इंटेलिजन्सच्या मदतीने भारताने अचूकतेने हल्ले केले. हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतरचे उपग्रह छायाचित्रांचे विश्लेषण करून शत्रूच्या संरचनांवर झालेल्या नुकसानीचा ठोस पुरावा सादर करण्यात आला.

या संपूर्ण मोहिमेदरम्यान इंटर-सर्व्हिस कोऑर्डिनेशन, म्हणजे लष्कर, नौदल आणि हवाईदल यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरला. हवाईदलप्रमुखांनी याचा विशेष उल्लेख करत सांगितले की, ही सुसंघटित यंत्रणा आणि नवतंत्रज्ञानामुळे ऑपरेशन सिंदूर केवळ यशस्वीच नव्हे, तर शत्रूला जबरदस्त धक्का देणारी ठरली.


Protected Content

Play sound