Home Cities यावल  भाजपच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी भुषण फेगडे यांची वर्णी

 भाजपच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी भुषण फेगडे यांची वर्णी


यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीत एक महत्त्वाची भर पडली असून, यावल येथील तरुण व उत्साही सामाजिक कार्यकर्ते भुषण जगन्नाथ फेगडे यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या यावल मंडळाचे अध्यक्ष सागर कोळी यांच्या नेतृत्वात, जळगाव जिल्हा पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर यांनी जाहीर केलेल्या तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्यात आली.

भुषण फेगडे हे स्थानिक राजकारणात सक्रिय असून, त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक उपक्रमांतून युवकांमध्ये नेतृत्वगुणांचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. या निवडीमुळे भाजपच्या यावल तालुक्यातील संघटनात्मक बळकटीला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

फेगडे यांच्या निवडीचे भाजप आमदार अमोल जावळे, जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, माजी सभापती व संचालक हर्षल पाटील, वैद्यकीय आघाडीचे डॉ. कुंदन फेगडे, माजी तालुका अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश फेगडे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते हेमराज फेगडे, नितिन महाजन आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव यांनी मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले.

या निवडीमुळे यावल तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये या नेतृत्वाचा फायदा पक्षाला निश्चितच होईल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound