Home क्राईम गावठी पिस्तूल व ५ जिवंत काडतूसांसह एकाला अटक; जळगाव एलसीबीची कारवाई

गावठी पिस्तूल व ५ जिवंत काडतूसांसह एकाला अटक; जळगाव एलसीबीची कारवाई


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका गुन्हेगाराला जळगावातील आंबेडकर मार्केट परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि ५ जीवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस मुख्याख्यालयाने प्रसिध्दी पत्रकानुसार कळविले आहे.

अक्षय अजय जयस्वाल (वय २४, रा. शिवाजी नगर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यावल पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीची सखोल चौकशी करत असताना, त्याने जळगाव येथील अक्षय अजय जयस्वाल याला एक देशी बनावटीचे पिस्तूल विकल्याची माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. पथकाने मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत संशयित आरेपी अक्षय जयस्वाल याला आंबेडकर मार्केट परिसरातून दुचाकीवर फिरत असतांना अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकीच्या सीट खाली पिस्तूल व ५ जीवंत काडतूस लपवलेले काढून दिले. ठेवण्याचे दिसून आले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह पोहेकॉ अकरम शेख, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, नितीन बाविस्कर, पोना किशोर सोनवणे, पोकॉ सिद्धेश्वर हापकर, रवींद्र कापडणे आणि गोपाल पाटील यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


Protected Content

Play sound