Home Cities जळगाव लेवा सखी घे भरारी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

लेवा सखी घे भरारी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लेवा सखी घे भरारी संस्थेचा सातवा वर्धापन दिन ५ ऑगस्ट रोजी हतनूर सांस्कृतिक हॉल, हतनूर वसाहत, महाबळ रोड, जळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष दिवशी लेवा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यात इयत्ता दहावी, बारावी तसेच महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसह, खेळ, कला किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पालकांनी आपल्या गुणवंत पाल्यांची नावे डॉ. पूजा महाजन यांच्याकडे पाठवून या सन्मान सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेने केले होते.

या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. यामध्ये नृत्य, गायन, नाटक, एकपात्री अभिनय, कविता वाचन आणि पारंपरिक वेशभूषा यांसारख्या कलाविष्कारांचा समावेश असेल. अध्यक्ष चित्रा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला समाजातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा वर्धापन दिन लेवा समाजाच्या एकजूटतेचे आणि गुणवत्तेचे प्रतीक ठरणार आहे.


Protected Content

Play sound