मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या अडचणीत असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यासाठी सुप्रीया सुळे यांनी पोस्ट लिहून त्यांना पाठींबा दिला आहे.
शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना कथित रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सत्ताधाऱ्यांनी त्यांना या प्रकरणात गोवल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे यांनी केला आहे. तर सत्ताधाऱ्यांनी याचा इन्कार करत खडसे पिता-पुत्रीला टार्गेट केले आहे.

या पार्श्वभूमिवर, आज खासदार सुप्रीया सुळे यांनी एका ट्विटच्या माध्यमातून रोहिणी खडसे यांची पाठराखण करत त्यांना धीर दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी रोहिणी खडसे यांच्यासोबत फोटो पोस्ट करून ‘वेळ संघर्षाची असो की, प्रत्यक्ष लढण्याची ! मी नेहमी सोबत !’ असे याला कॅप्शन दिले आहे. यातून त्यांनी आपण रोहिणी खडसे यांच्या सोबत असल्याचा संदेश दिला आहे.



