Home क्राईम साकळी गावाजवळ अपघात : एक ठार; एक जखमी

साकळी गावाजवळ अपघात : एक ठार; एक जखमी


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी गावाजवळ यावल चोपडा राज्य महामार्गावर सांयकाळी झालेल्या दोन दुचाकी वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्युतर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी की ,राजेन्द्र रमेश सपकाळे ( वय ४५ वर्ष राहणार वढोदा तालुका यावल ) हे साकळी गावाकडून वढोदा गावाकडे आपल्याकडील एमएच १९ई बी ५४४२ या मोटर सायकलने येत असतांना वसंत महाजन यांच्या जिनिंग जळील पुलाच्या वळणावर सायंकाळी ५ ३०ते ६ वाजेच्या सुमारास दोन दुचाकी वाहनांनी समोरा समोर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात यांचा जागीच मृत्यु झाला.

या अपघातात दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून , मयत राजेन्द्र सपकाळे यांचा मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहे . अपघातात मयत झालेले राजेंद्र सपकाळे हे भाजपाचे कार्यकर्ते व जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे यांचे भाचे आहे. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound