शेगाव प्रतिनिधी । गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेल्या दोन्ही पॅसेंजर गाड्या उद्यापासून सुरू करण्यात येत आहे.
या एक्सप्रेस गाड्यांची सुरुवात होणार असून रिझर्वेशनच्या डब्ब्यात गर्दी कमी होणार आहे. तसेच प्रवासांच्या पैशांतही बचत होणार आहे. पुढीलप्रमाणे गाड्यांचे नियोजन केले असून याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 1८ जुलैपासून भुसावळ-वर्धा-भुसावळ पॅसेंजर सुरू होणार आहे. ५११९७ ही पॅसेजर भुसावळ येथून दुपारी २.३० वाजता सुटणार असून ही गाडी दुपारी ४.४० वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे. तसेच ५११९८ ही गाडी १८ जुलै रोजी वर्धा येथून रात्री ११ वाजता सुटेल व सकाळी ५.१५ वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर पोहचेल. त्याचप्रमाणे भुसावळ नागपूर पॅसेंजर गाडी १८ जुलै रोजी रात्री साडेसात वाजता भुसावळ स्थानकावरून सुटेल व ९.३६ वाजता शेगाव स्थानकावर पोहचणार आहे. तसेच ही गाडी २० जुलै रोजी नागपूर येथून परतीच्या मार्गावर सकाळी ४.५० वाजता सुटून शेगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ११.३० वाजता पोहचण्याची वेळ आहे. या दोन्ही पॅसेंजर गाड्या १८ जुलैपासून पुर्ववत सुरू होत असल्यामुळे प्रवासांमध्ये त्याचा आनंद पाहण्यास मिळत आहे.