Home Cities धरणगाव भाजप पक्ष संघटना होणार हायटेक; पी.सी. आबा पाटलांची माहिती !

भाजप पक्ष संघटना होणार हायटेक; पी.सी. आबा पाटलांची माहिती !

0
185


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीने (भाजप) पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या अंतर्गत, पक्षाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्षांना टॅबचे वितरण करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पी.सी. आबा पाटील यांनी ही माहिती दिली.

या ‘डिजिटल’ उपक्रमामुळे पक्षाची कार्यपद्धती अधिक वेगवान आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे. मंडल अध्यक्ष हे पक्षाचे तळागाळातील महत्त्वाचे दुवे असल्याने, त्यांना टॅब मिळाल्याने थेट जनतेपर्यंत पोहोचणे आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे सोपे होणार आहे. तसेच, पक्षाचे विचार आणि ध्येय धोरणे अधिक प्रभावीपणे मांडता येतील.

या प्रसंगी भाजपचे नेते पी.सी. आबा पाटील यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ महाजन, शिरीष अप्पा बयस, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडीचे जिल्हाध्यक्ष कमलेश तिवारी, मार्केटचे सभापती जिजाबराव पाटील, माजी सभापती पुनिलाल महाजन, धरणगाव मंडळ अध्यक्ष दिनेश पाटील, पाळधी मंडळ अध्यक्ष किशोर झंवर, कैलास माळी सर, निर्दोष पवार, दिलीप महाजन, चिंतामण पाटील, चंदन पाटील, कन्हैया रायपूरकर, विजय महाजन, सुनील चौधरी, मधुकर महाजन, डॉ. नितीन पाटील, विशाल पाटील, सचिन पाटील, वासुदेव महाजन, जितेंद्र पाटील आणि योगेश माळी यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound