
अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री व लोकप्रिय नेता मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “महा रक्तदान शिबिरा”ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध मंडळांमध्ये एकाच वेळी पार पडलेल्या या सामाजिक उपक्रमात शेकडो रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली.

या विशेष उपक्रमाचे आयोजन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. प्रदेश उपाध्यक्ष (युवा मोर्चा) भैरवी वाघ, माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, प्रदेश पदाधिकारी हरचंद लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर शहर मंडळ, जानवे मंडळ व पातोंडे मंडळ येथे एकाच वेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उपक्रमाला यशस्वी केले.
या रक्तदान शिबिरात विशेषतः तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अनेक युवकांनी प्रथमच रक्तदान करून समाजप्रती आपली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी दाखवून दिली. भाजपच्या विविध आघाड्यांतील कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले. भाजप शहर मंडळ अध्यक्ष योगेश महाजन, सरचिटणीस भरत सिंह परदेशी, देविदास लांडगे, पांडुरंग महाजन, विजय राजपूत, उमेश वाले, भारती सोनवणे, राकेश पाटील, श्याम पाटील, कैलास भावसार, प्रीतपाल सिंग बग्गा, रमेश धनगर, दिलीप ठाकूर, राम भैय्या कलोसे, शिवा महाजन, विष्णू सैनानी, पिंटू चौधरी, दीपक भोई, बापू पाटील, अनिल लाड, रवी ठाकूर, सचिन साळुंखे, संभाजी पाटील, महेश पाटील यांच्यासह युवा मोर्चा सरचिटणीस राहुल चौधरी, समाधान पाटील, स्वप्निल चौधरी, भूषण सूर्यवंशी, निलेश पाटील, कल्पेश पाटील, भूषण महाजन, अक्षय चव्हाण, उज्वल मोरे, शुभम मोरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या उपक्रमात सक्रिय होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अत्यंत शिस्तबद्धरीत्या करण्यात आले होते. सामाजिक अंतर पाळून, आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून हे शिबिर आयोजित करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत भाजपच्या या प्रयत्नाचे कौतुक केले.



