Home Cities चाळीसगाव भाजपमध्ये ‘इनकमींग’ : चाळीसगावातील मातब्बर पदाधिकारी पक्षात दाखल

भाजपमध्ये ‘इनकमींग’ : चाळीसगावातील मातब्बर पदाधिकारी पक्षात दाखल


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ना. गिरीश महाजन व आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज चाळीसगाव तालुक्यातील मातब्बर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.

आज मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला. याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ना. गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य तथा शरद पवार गटाचे पदाधिकारी भूषण काशिनाथ पाटील, चाळीसगावचे माजी उपनगराध्यक्ष भगवान बापूजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते दीपक कच्छवा, उदय वाघ, हितेश व्यास, दीपक पवार आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश घेतला. या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी ना. गिरीशभाऊ महाजन यांनी या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतांना आ. मंगेश चव्हाण यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतांना ते मुख्य प्रवाहात येत असल्याचे नमूद केले.


Protected Content

Play sound