Home क्राईम ब्रेकींग : भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला उडविले; तरूण ठार, दुसरा गंभीर !

ब्रेकींग : भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला उडविले; तरूण ठार, दुसरा गंभीर !


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसाळा येथील मारूतीचे दर्शन घेण्यासाठी मित्रांसोबत जात असलेल्या तरूणाच्या दुचाकीला भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने वराड येथील १९ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता नशिराबाद गावाजवळील टोल नाक्याजवळ घडली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने आईवडीलांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल राजू पाटील वय १९ रा. वराड ता. धरणगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील वराड गावात हर्षल पाटील हा तरूण आईवडील आणि बहिण यांच्या सोबत वास्तव्याला होता. बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथी जागृत मारूतीचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरून दर शनिवारी अनेक भाविक जात असतात. त्यांच पध्दतीने हर्षल पाटील हा गावातील ८ ते १० मित्रांसोबत दुचाकीने शनिवारी १९ जुलै रोजी पहाटे दर्शनासाठी निघाला होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीवर त्याचा मित्र कुणाल गोकुळ पाटील रा.वराड ता.धरणगाव हा होता. सकाळी ६ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील टोल नाकाजवळील पुलावरून जात असतांना भरधाव डंपरने हर्षलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत हर्षल पाटील हा तरूण ठार झाला तर सोबत असलेला कुणाल पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हर्षल हा आईवडीलांचा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound