Home क्राईम शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरूणाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड !

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरूणाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मला व भावाला शिवीगाळ का केली असा जाब विचारणाऱ्या तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करून लोखंडी पाईप डोक्यात टाकून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी १५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता त्रिभूवन कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील त्रिभूवन कॉलनी येथे रविंद्र रामचंद्र धनगर वय २५ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. महावितरण कंपनीत वरीष्ठ तंत्रज्ञ म्हणून ते नोकरीला आहेत. मंगळवारी १५ जूलै रोजी सकाळी १०.३० वाजता रविंद्र याने मला व भावाला का शिवीगाळ केली असता जाब विचारण्यासाठी गेले असता त्याला संशयित आरोपी सुरज गणेश परदेशी, योगेश सिताराम परदेशी, भाग्यदीप उर्फ बब्बु गणेश परदेशी सर्व रा. त्रिभूवन कॉलनी, जळगाव यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. यातील सुरजने लोखंडी पाईप रविंद्र धनगर याच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या रविंद्रवर खासगी रूग्णालयात उपचार घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिार्यदीवरून मारहाण करणारे सुरज गणेश परदेशी, योगेश सिताराम परदेशी, भाग्यदीप उर्फ बब्बु गणेश परदेशी सर्व रा. त्रिभूवन कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound