नाशिक -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।| राज्यातील आजी-माजी मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी असे तब्बल एकूण 72 मान्यवर हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा धक्कादायक दावा एका नेत्याने केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये हनी ट्रॅपचा प्रकार घडला असून यात तब्बल 72 मातब्बर लोकांचा समावेश असल्याचा गौप्यस्फोट एका नेत्याने पत्रकारांशी अनौपचारीक बोलतांना केला आहे. या संदर्भात मुंबईत एका महिलेने पोलिसात तक्रार केली असली तरी या प्रकरणाबाबत बोलण्यास कुणीही तयार नसल्याचे दिसून येत आहे.

या कथित हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या मंडळीत राज्यातील आजी-माजी मंत्री आणि अतिशय वरिष्ठ अशा अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाशिकच्या राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू असली तरी अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतांना हा प्रकार उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.



