
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील गट व गण रचना जाहीर झाली आहे. पुढील काही महिन्यामध्ये निवडणुका लागण्याची शक्यता आहे. रावेर तालुक्यात सहा गट तर बारा गण निश्चीत करण्यात आला आहे.

आ.अमोल जावळे आमदार झाल्या नंतर त्यांची ही पहीलीच परीक्षा असणार आहे.त्यांना सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आणून पक्षाकडे आपली ताकद दाखवण्याची नामी संधी असेल.तर विरोधी पक्षातील माजी आमदार शिरीष चौधरी यांना काँग्रेस व मित्रपक्षाचे राष्ट्रवादी (शप) शिवसेना(उबाठा) उमेदवार निवडून आणण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. माजी आमदार अरुण पाटील यांना मानणारा मोठा जनाधार तालुक्यात आहे.सद्या राष्ट्रवादी (श प) मध्ये जरी असले तरी पुढील आगामी निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे.एकंदरीत आगामी निवडणुका सर्व कांटे की टक्कर असेल यावेळेस अनेक जण इच्छुक असल्याने सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे.
रसलपूर-के-हाळे गट भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके यांचा प्रभाव असलेला गट मागील वेळी येथून महिलेला संधी मिळाली होती. यावेळेस पुरुषाला येथून संधी मिळणार आहे.येथून प्रा उमांकांत महाजन, चंद्रकांत पाटील (के-हाळा) संदीप सावळे,येथून इच्छुक आहे.भाजपाला येथून जिंकण्यासाठी सुरेश धनके स्वतः उमेदवारी करतात की धनके आपली ताकद कोणाच्या मागे उभी करतात यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहे.या गटात भाजपा व काँग्रेस पक्षाची चांगली पकड आहे
रसलपूर गणात पाल, जिन्सि,गुलाबवाडी,मोरव्हाल,रसलपूर ,खिरोदा प्र रावेर, मुंजलवाडी या गावांचा समावेश आहे.
के-हाळे बु गणात रमजीपूर,मंगरुळ,आभोडा,अहिरवाडी,पिंप्री,के-हाळे,बक्षीपुर,रसलपुर,खिरोदा प्र रावेर,मोहगण बुद्रुक पिंप्री या गावांचा समावेश आहे.
वाघोड-खिरवड गट जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील यांचे गाव याच गटात आहे.येथून आता त्यांचे पती प्रल्हाद पाटील, सभापती सचिन पाटील,मंदार पाटील,वाय व्ही पाटील, गणेश महाजन,राजन लासुरकर,नितीन पाटील,गणेश बोरसे इच्छुक आहे.भाजपा, राष्ट्रवादी,शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस, शिवसेना (उबाठा) पक्षाची देखील उमेदवार येथून इच्छुक आहे. निलेश सावळे ( कर्जोत) यांचा देखिल संपर्क दांडगा आहे. तर जयश कुयटे यांची देखिल भूमिका गटात महत्वाची असणार आहे. तालुक्यात सर्वात काँटे की टक्कर याच गटात होणार आहे.
वाघोड गणात पाडळे,निरुळ,कर्जोत,खानापुर,अजनाड,चोरवड,अटवाडेवाघोड या गावांचा समावेश आहे.
खिरवड गणात भोकरी,तामसवाडी,बोरखेडा, दोन्ही मोरगाव, दोघे, नेहेते, खिरवड,पुनखेडा,पातोंडी,थेरोळे, धुरखेडा, निंभोरासीम या गावांचा समावेश आहे.
वाघोदा बु- थोरगव्हाण गट हा रावेर तालुक्यात जरी असला तरी मुक्ताई नगर विधानसभा मतदार संघात येतो.
या गटावर आ चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे कद्दावर नेते नंदकिशोर महाजन, दोघांची चांगली ताकद या गटावर आहे.येथून भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटा कडून उमेदवारीसाठी अनेक जन इच्छुक आहे.येथून माजी तालुकाध्यक्ष महेश चौधरी इच्छुक आहे.
वाघोदा बु गणात दोन्ही कोचूर, मस्कावद सीम,मस्कावद खुर्द,बोरखेडे सीम, दसनूर, सिंगनूर,वाघोदा बु गावांचा समावेश आहे.
थोरगव्हाण गणात मस्कावद बुदुक,सुनोदे,गाते,वाघोदे खुर्द, थोरगव्हाण, मांगी, चुनवडे, सुदगाव,रायपुर,गहुखेडे,रंगगाव,तासखेडे, लुमखेडा दोन्ही उदळी गावांचा समावेश आहे.
ऐनपुर- तांदलवाडी गट देखिल रावेर तालुक्यातील असला तरी मुक्ताई नगर विधानसभा मतदारसंघात आहे.येथून भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट कडून निवडणूक लढण्यासाठी अनेक जन इच्छुक आहे. या गटावर आ चंद्रकांत पाटील व भाजपाचे कद्दावर नेता नंदकिशोर महाजन आणि माजी आमदार अरुण पाटील यांची ताकद आहे.येथील गटातून भाजपाचे दुर्गेश पाटील, इच्छुक आहे.
ऐनपुर गणात ऐनपुर, रेंभोटे, दोन्ही खिर्डी,सुलवाडी,वाघाडी गावांचा समावेश आहे.
तांदलवाडी गणात शिंगाडी,भामलवाडी,कोळोदे, धामोडी, कांडवेल, पुरी, गोलवडे, बलवाडी, सिंगत, तांलदवाडी मांगलवाडी आंदलवाडी या गावांचा समावेश आहे.
निंभोरा- विवरे गट तालुक्यात दुसरी काँटे की लढत या गटात होणार आहे. या गटातून आर्थिक सक्षम असलेले अनेक उमेदवार इच्छुक आहे. या गटावर आ अमोल जावळे माध्यमातून भाजपा तसेच माजी आमदार शिरीष चौधरी आणि माजी आमदार अरुण पाटील यांचा प्रभाव आहे.येथून कुसुंबा येथील अतुल महाजन,दुर्गादास पाटील,मंदार पाटील, सुनिल कोंडे सह अनेक उमेदवार इच्छुक आहे.येथून चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
निंभोरा बुद्रुक गणात निंभोरा बुद्रुक, वडगाव, अजंदे, भोर, नांदुरखेडे, निबोल, विटवे,सांगवे या गावांचा समावेश आहे.
विवरे बुदुक गणात सहस्रलिंग, दोन्ही विवरे,लालमाती, दोन्ही कुसुंबा, शिंदखेडा,उटखेडे,भाटखेडे या गावांचा समावेश आहे.
खिरोदा प्र यावल- चिनावल गट माजी आमदार शिरीष चौधरी यांचा होम गट येथून काँग्रेस भाजपा आणि शिवसेना शिंदे गट कडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जन इच्छुक आहे. आ शिरीष चौधरी यांचे गाव याच गटात येते तर आ अमोल जावळे देखील येथून भाजपला जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.
खिरोदा प्र यावल गणात गारखेडे,निमड्या,गारबर्डी,मोहमांडली नवी, तिड्या, अंधारमळी, लोहारा,चिचाटी,गौलखेडा,सावखेडे बुद्रुक,खिरोदा प्र यावल या गावांचा समावेश आहे.
चिनावल गणात कुंभारखेडा, रझोदा, कळमोदे, सावखेडेखुर्द गावांचा समावेश आहे.



