जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाभिक समाज जळगाव जिल्हा संघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर अंगरक्षक शिवा काशिद यांची पुण्यतीथी दिनांक 13 जुलै 2025 रोजी पांझरापोळ गोशाळा येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध उपक्रमांची सांगड घालण्यात आली, तसेच पुढील महिन्यातील आराध्य दैवत संत सेना महाराज पुण्यतीथी उत्सवासाठी नियोजन बैठकही पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वन विभागाचे निवृत्त अधिकारी राजेंद्रजी अहिरे होते. प्रारंभी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ वखरे आणि जेष्ठ नेते कांतिलाल वाघ यांच्या हस्ते वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी शिवा काशिद यांच्या पराक्रमाची माहिती दिली आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

पुण्यतीथीनंतर झालेल्या बैठकीत जळगाव शहर नाभिक समाजाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. मयुर सोनवणे यांची शहर अध्यक्षपदी निवड झाली आहे. योगेश गायकवाड, बाळू सोनवणे हे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले असून प्रेम डापसे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहसचिव म्हणून कैलास शिंदे यांची निवड झाली आहे. याशिवाय ज्ञानेश्वर क्षिरसागर (शहर संघटक), विजय पर्वते (दुकानदार संघटना अध्यक्ष), भुषण शिंदे (उपाध्यक्ष), लहुराऊत (तालुका सहसचिव) आणि राजेंद्र अहिरे (कर्मचारी संघटना अध्यक्ष) यांचीही नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला शहरातील विविध समाजबांधव आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितांमध्ये योगेश गायकवाड, भुषण शिंदे, प्रेम डापसे, मयुर सोनवणे, रविंद्र महालकर, विजय पर्वते, गणेश शिंदे, शांताराम आंबेकर, राजेंद्र बिढे, मनोज बिढे, विलास साळुंखे, बाळू क्षिरसागर, वासुदेव अहिरे, प्रकाश क्षिरसागर, लहू राऊत, रमेश शिंदे, देविदास ठाकरे यांचा समावेश होता. सर्वांनी मिळून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपली भूमिका बजावली.
या उपक्रमामुळे समाजात ऐक्य, नेतृत्व व प्रेरणादायी कार्यसंस्कृतीचा विकास होत असल्याचे चित्र दिसून आले. वीर शिवा काशिद यांचे स्मरण करताना उपस्थितांनी नव्या कार्यकारिणीच्या नियुक्तीस शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या कार्यक्रमांसाठी एकत्रितपणे काम करण्याचे वचन दिले.



