Home क्राईम खेळताना अचानक जमिनीवर कोसळल्याने नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

खेळताना अचानक जमिनीवर कोसळल्याने नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

0
531

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील आर.आर.विद्यालयात खेळत असताना अचानक जमिनीवर पडल्याने नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. कल्पेश वाल्मीक इंगळे (वय 15 रा. कठोरा जि. बुलढाणा ह.मु. कासमवाडी, जळगाव ) असे मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पेश इंगळे हा विद्याथ आई वडील, बहीण आणि लहान भावासोबत वास्तव्याला होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी 11 जुलै रोजी सकाळी शाळेत आलेला होता. दुपारी तीन वाजता शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवणासाठी सुट्टी झाली होती. विद्यार्थ्यांसोबत खेळत असतात तो अचानक जमिनीवर कोसळला अशी माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली आहे. दरम्यान त्याला शिक्षकांनी उचलून तातडीने जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यावेळी कल्पेशच्या आई वडील आणि भाऊ यांनी एकच आक्रोश केला होता.

दरम्यान कल्पेश याच्या आई-वडिलांनी इतर विद्यार्थ्यांकडून त्याला मारहाण झाली असल्याचा आरोप केला. सकाळी गेला तेव्हा तो चांगला होता. दोन दिवसांपूवसुद्धा त्याचा वाद झाला होता, त्यामुळे शाळेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात यावे, चौकशी करावी व दोषींवर अटक करून कारवाई करावी त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असल्याचा पवित्रा मृत कल्पेश याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. कल्पेश याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. तर, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound