Home प्रशासन नगरपालिका रावेर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर; ४२ जागांवर महिलाराज

रावेर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर; ४२ जागांवर महिलाराज


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एकूण ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज (मंगळवार, ८ जुलै) येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. या सोडतीमुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार असून, तब्बल ४२ ग्रामपंचायतींवर महिलाराज असणार आहे, हे या सोडतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

आज सकाळी ११ वाजता तहसीलदार बी. ए. कापसे यांच्या उपस्थितीत ८२ ग्रामपंचायतींचे प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर, दुपारी चार वाजता फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत महिला आरक्षणाची सोडत पार पडली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण सोडत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे आणि भूषण कांबळे यांनी सहकार्य केले.

ग्रामपंचायत निहाय आरक्षण तपशील (महिला आरक्षणासह):

अनुसूचित जाती (पुरुष): पाडळे खुर्द, खिरोदा प्र. रावेर, वाघोदे खुर्द, गौखेडा, मस्कावद बु., मांगी चूनवाडे.

अनुसूचित जाती (महिला): विवरे खुर्द, कुंभारखेडा, सावखेडा बु., धामोडी, कळमोदे, खानापूर मुंजलवाडी.

अनुसूचित जमाती (पुरुष): मस्कावदसीम, निरूळ, नेहेते, पुनखेडा, सुदगाव.

अनुसूचित जमाती (महिला): चिनावल, भोर, दोधे, थेरोळे, वाघोड, कोचूर बु.

नामाप्र (पुरुष): वाघोदा बु., कर्जोद, थोरगव्हाण, सिंगत, खिर्डी बु., वघाडी, सुनोदे, विवरे बु., अजंदे, विवरे बु., दसनुर, बलवाडी.

नामाप्र (महिला): रणगाव, रमजीपूर, आंदलवाडी, अहिरवाडी, उटखेडा, खिर्डी खुर्द, अजनाड, निंभोरा बु., धुरखेडा, तासखेडा, गौरखेडा.

सर्वसाधारण (महिला): कोचूर खुर्द, उदळी खुर्द, निंबोल, भोकरी, मस्कावद खुर्द, रझोदा, रायपूर, शिंगाडी, गाते, विटवे, शिंदखेडा, बक्षीपूर, मोरगाव बु., कोळदे, ऐनपुर, पुरी, गोलवडे, वडगाव, सावखेडा खुर्द.

सर्वसाधारण (पुरुष): भातखेडा, खिरोदा प्र. यावल, रसलपूर, केर्‍हाळे खु., नांदुरखेडा, केर्‍हाळे बु., उदळी बु., तांदलवाडी, तामसवाडी, मोरगाव खु., खिरवड, अटवाडे, पातोंडी, मांगलवाडी, सुलवाडी, रेंभोटा, निंभोरा सिम, कांडवेल.

या आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पुढील वाटचालीचे चित्र स्पष्ट झाले असून, आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग येणार आहे.


Protected Content

Play sound