पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातून घरी येत असतांना बैलगाडी चालवित असतांना तोल लावून पडल्याने झालेल्या डोक्याला गंभीर दुखापतीमुळे शेतकऱ्यांचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी विठ्ठल पाटील वय ६८ रा. दगडी सबगव्हाण ता. पारोळा असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण येथे राहणारे शिवाजी पाटील हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला होतो. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. ३ जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते शेतातून बैलगाडीने घरी येत असतांना त्यांचा तोल जावून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास साळुंखे हे करीत आहे.




