एरंडोल प्रतिनिधी । येथील डी.डी.एस.पी.महाविद्यालयात बुधवार १७ जुलै रोजी G.C.C.- T.B.C.संगणक टायपिंग परीक्षा होणार होती. परंतु, तांत्रिक अडचण निमार्ण झाल्याने ही परीक्षा धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घेण्यात येणार आहे.
डी.डी.एस.पी.महाविद्यालयात बुधवार दि.१७ जुलै रोजी G.C.C.- T.B.C.संगणक टायपिंग परीक्षा परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, आज दुपारी ४ वाजता संगणक इंस्टालेशन करतांना १२ संगणकांचे मदरबोर्ड व एम.पी.पी.एस.शोर्टसर्किटने जळाले. सदर परीक्षेसाठी एरंडोल व धरणगाव तालुक्यातील विद्यार्थी प्रविष्ठ होते. शहरात कोणत्याही शाळेत २० संगणक नसल्याने सदर परीक्षा धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात होत असल्याचे व डी. डी. एस. पी.महाविद्यालयात परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनी धरणगाव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात दि.१७ जुलै रोजी सकाळी ८:३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी केले आहे.