जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून भामट्यांनी दमदाटी करीत दोन मोबाईल व ७५ हजार रुपये लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार ७ जुलै रोजी घडला होता. या प्रकरणी महिलेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात आज पुन्हा तक्रार दिली आहे.
या संदर्भात अधिक असे की, ७ जूलै २०१९ रोजी संबंधित महिलेच्या घरात सहा ते सात भामट्यांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला. महिलेसह घरातील आणखी एकास दमदाटी केली. यानंतर घरातील दोन मोबाईल व ७५ हजार रुपयांची रोकड लांबवत पळ काढला. संबधित महिलेले त्याच दिवशी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार केली. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, भामट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी या महिलेने रविवारी पुन्हा पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे.