भुसावळ, प्रतिनिधी | शहर काँग्रेस कमिटीतर्फे माजी मुख्यमंत्री कै. शंकररावजी चव्हाण यांच्या जंयतीनिमित्त आज (दि.१४) येथील संत गाडगे बाबा वसतिगृहात गरीब मुलांना जेवण देण्यात आले. तसेच वृक्षारोपण करुन कै.शंकरराव चव्हाण यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी भुसावळ शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रविंद्र निकम, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, सरचिटणीस शैलेश अहिरे, सचिव सागर कुरेशी, सचिन गायकवाड, सुनील दाडंगे, प्रमोद गायकवाड, मुकुंद नामदास, मंगेश तायडे, साहील कुरेशी, विलास खरात, रवि साळवे, महेंद्र महाले आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.