जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्यावर तरुणावर दोघांनी गोळीबार करून जखमी केल्याची घटना खडका रोड चौफुली येथे घडली होती. या प्रकरणी आज पहाटे एलसीबीच्या पथकाने तपासचक्र फिरवीत दोघांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की खलील अली मोहम्मद शकील (वय २५ रा. गेंदालाल मिल जळगाव) हा भुसावळ येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी दुपारी गेला होता. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास खडका रोड चौफुलीवरून तो परतत असताना विकी नामक तरुण आणि एका अन्य तरुणाने बंदूक हातात घेऊन तीन गोळ्या हवेत तर दोन गोळ्या जमिनीवर झाडल्या होत्या. यासोबत दोन गोळ्या खालीलच्या डाव्या हाताच्या दंडावर झाडल्याने तो जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेत नातेवाइकांनी तातडीने खासगी वाहनाने भुसावळून जिल्हा वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते.
दरम्यान, पोलिसांनी खुशाल बोरसे आणि मयूर उर्फ विक्की दीपक अलोणे या दोघांना पोलिसांनी रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कालींका माता मंदाराजवळून अटक केली आहे. संबंधित तरुणांमध्ये पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे पुन्हा एकदा भुसावळ शहर हादरून गेले होते.