नेपाळ (वृत्तसंस्था) मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात बळी पडलेल्यांची संख्या रविवारी ४३ वर पोहचली असून अद्याप २४ हून अधिक जण बेपत्ता आहेत.
नेपाळमधील मुसळधार पावसाने आतापर्यंत ललितपूर, कावरे, कोटांग, भोजपूर, मकानपूर यासह विविध जिल्ह्य़ांमध्ये ४३ बळी घेतले आहेत. त्याचप्रमाणे २० जण जखमी झाले असून २४ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत. मदतकार्य वेगाने सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर येण्याचा आणि दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. सर्व महत्त्वाच्या महामार्गावरील वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे.