Home क्राईम फैजपूर येथे अवैध वाळू वाहतूकदारावर कारवाई

फैजपूर येथे अवैध वाळू वाहतूकदारावर कारवाई

tractors
tractors

tractors

फैजपुर प्रतिनिधी । फैजपूर परीसरात अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक करतांना प्रांताधिकारी यांनी पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, ट्रक्टर चालक खेमा हेमा कोळी रा. फैजपूर यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर एम.एच.ए. एन ०८५१ व ट्रॉली क्र एमएच 19 एन ९१०३ वर अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती फैजपूर प्रांताधिकारी डॉ. अजीत गोडबोले यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पाहणी दरम्यान अवैध वाळू वाहतूक करत असल्याने ट्रक्टर व ट्रॉली जप्त करून चालक खेमा कोळी यांच्या विरोधात फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पंचनामा तलाठी पी.पी. जावळे यांनी केला.

या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तर महसुल विभागाचे अभीनंदन होत आहे. दरम्यान फैजपूर शहरात मुरूम आणि वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक रात्री अपरात्री होत असल्याने अनेक नागरीकांच्या तक्रारी होत्या. पुढील कारवाईसाठी प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबाले यांनी वाळू माफियांवर करडी नजर ठेवली आहे.


Previous articleशिवदास गायकवाड यांचे अपघाती निधन
Next articleभुसावळात युवकावर गोळीबार
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound