Home टेक्नोलॉजी जिओ हॉटस्टारने रचला इतिहास; चॅपियन्स ट्रॉफीच्या फायनलला मिळाले ‘इतके’ व्ह्यू

जिओ हॉटस्टारने रचला इतिहास; चॅपियन्स ट्रॉफीच्या फायनलला मिळाले ‘इतके’ व्ह्यू


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत क्रिकेट चाहत्यांना जल्लोष साजरा करण्याची संधी दिली. हा सामना रविवारी, 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत न्यूझीलंडला मर्यादित धावसंख्येवर रोखले आणि भारताने 254 धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्याने केवळ क्रिकेटमध्येच नाही तर डिजिटल विश्वातही नवा विक्रम प्रस्थापित केला. जिओ हॉटस्टारवर हा सामना तब्बल 90.1 कोटी प्रेक्षकांनी लाईव्ह पाहिला, जो ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतचा सर्वाधिक व्ह्यूवरशिप विक्रम ठरला. भारताचा ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी कोट्यवधी क्रिकेटप्रेमींनी एकाच वेळी लॉगिन करून जिओ हॉटस्टारच्या सर्व्हरवर मोठा ट्रॅफिक निर्माण केला. या आधी देखील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सामन्यांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकसंख्या मिळाली होती.

भारत विरुद्ध पाकिस्तान: 60.2 कोटी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (उपांत्य सामना): 66.9 कोटी
भारत विरुद्ध न्यूझीलंड (अंतिम सामना): 90.1 कोटी

जिओ हॉटस्टारने जाहिरात-आधारित आणि प्रीमियम सदस्यता योजनांद्वारे मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले. सध्या कंपनी तीन महिन्यांसाठी 149 रुपये, वार्षिक 499 रुपये आणि जाहिरातमुक्त प्रीमियम योजना 1499 रुपयांमध्ये देते. यामुळे जिओ हॉटस्टार ला प्रचंड आर्थिक लाभ मिळाला असून, भविष्यातही अशी लोकप्रियता टिकवण्याच्या दिशेने कंपनी कार्यरत आहे.


Protected Content

Play sound