Home क्राईम टायर दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान; नगरपालिकेचा बंब ठरला कुचकामी

टायर दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान; नगरपालिकेचा बंब ठरला कुचकामी

0
124


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव येथील मुक्ताईनगर रोडवर जुन्या लोककल्याण हॉस्पिटलच्या कंपाऊंडमधील ‘टायबा टायर्स’ या टायर दुकानाला शनिवारी १ मार्च रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत दुकानातील नवीन व जुने टायर, दुकानासमोर लावलेली स्कूटर आणि मोटारसायकल जळून खाक झाली. या आगीत जवळपास १० ते १५ लाखांपर्यंतचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, शेजारील चायनीज निजाम शेख, रेडिएटर शॉप इस्माईल शहा, विश्वकर्मा मोटर गॅरेज हेमंत लोहार, मझहर ऑटो गॅरेज आणि इलेक्ट्रिक गॅस वेल्डिंग या दुकानांनाही आगीची झळ पोहोचली. या दुकानांमधील साहित्यही आगीत जळून खाक झाले. बंद असलेल्या लोककल्याण हॉस्पिटलच्या आवारातील जुने वैद्यकीय साहित्यही आगीत जळून नष्ट झाले.

आग विझवण्यासाठी वरणगाव फॅक्टरीच्या अग्निशमन दलाने तातडीने मदतकार्य सुरू केले. प्रशांत ठाकूर, धनेश्वर चौधरी आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले. होमगार्ड महेश पाटील, महेश सोनार, गजानन चव्हाण यांनीही मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली. वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव, सहायक फौजदार श्रावण जवरे, विजू बावस्कर, प्रशांत ठाकूर, ईश्वर तायडे यांनीही घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.


Protected Content

Play sound