Home क्राईम महसुल पथकाला पाहताच चालक वाळूचे ट्रॅक्टर घेवून पसार !

महसुल पथकाला पाहताच चालक वाळूचे ट्रॅक्टर घेवून पसार !

0
107


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा गावातील गिरणा नदीपात्रातून अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकावर महसूल पथकाने कारवाई करत असताना चालकाने ट्रॅक्टर घेऊन पसार झाला ही घटना गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील धानोरा गावातील गिरणा नदीपात्रातून अवैधपणे वा२० फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता कारवाई केली. दरम्यान विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना ट्रॅक्टर चालकाने महसुल पथकाला पहताच ट्रॅक्टर घेवून पसार झाला होता. दरम्यान या घटनेबाबत खेडी खुर्द गावाचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत बडगुजर यांनी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता चालक आणि त्याचे मालक या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय भालेराव करीत आहे.


Protected Content

Play sound