Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे यश

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे यश

0
107

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट्स (आयएपी) परिषदेत उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळवले आहे.

नाशिक येथे आयोजित आयएपी परिषदेत डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या २४ विद्यार्थ्यांनी आणि दोन प्राध्यापकांनी सहभाग घेतला. प्रा. डॉ. मुकेश शिंदे आणि डॉ. रिया अग्रवाल यांच्यासह प्राचार्य डॉ. जयवंत नागूळकरही उपस्थित होते.

परिषदेत डॉ. जयवंत नागूळकर यांनी पॅनल चर्चेत सहभाग नोंदवत उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर प्रा. डॉ. मुकेश शिंदे आणि डॉ. रिया अग्रवाल यांनी आपले शोधनिबंध सादर केले. प्रा. डॉ. मुकेश शिंदे यांना पीएचडी गटात (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान) प्रभावी सादरीकरणासाठी प्रथम पारितोषिक मिळाले. या परिषदेत महाविद्यालयाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Protected Content

Play sound