Home क्राईम फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

0
127


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत हॉटेल प्रगती पॅलेस येथे विवाहितेवर अत्याचार केला तर फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे घेवून शारिरीक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील काशीराम नगरात राहणारा एका ३२ वर्षीय महिलेला जळगाव शहरातील हॉटेल प्रगती पॅलेस येथे संशयित आरोपी विनोद रामचंद्र पाटील रा.श्रावण नगर, जळगाव याने विवाहितेवर अत्याचार केला. तसेच फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी व फिर्यादीचे पतीकडून पैसे घेतले, त्यानंतर पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार ८ जुलै २०२२ ते १२ जून २०२३ दरम्यान घडला आहे. या संदर्भात पीडित महिलेने अखेर सोमवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी विनोद रामचंद्र पाटील यांच्यावर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियादारी करीत आहेत.


Protected Content

Play sound