रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवसा फुग्यांची विक्री करून रात्री चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

रावेर शहरासह परिसरात झालेल्या चोऱ्या व घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
रावेर शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये सहभाग असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी दिवसाच्या वेळेत फुग्यांची विक्री करायचे आणि रात्री घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी होत होते, अटक केलेल्या आरोपी मध्ये मिठू काळे (वय ६० रा जालना); राकेश काळे (वय४० रा मंगळूर जि जालना ) आणि संदीप चव्हाण (वय ३० रा परतूर जि जालना ) अशी अटक केलेल्यांची नाव आहे. त्यांच्याकडे टॉमी, कटर, हातोडे इत्यादी साहित्य आढळले. रावेर पोलिसांनी केलेल्या कामगिरी बाबत जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
या पोलिस पथकाने केली कारवाई
वाढलेल्या चोऱ्या मुळे पोलिस प्रशासन हरकत मध्ये आले होते. पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोकॉ श्रावण भील, पोकॉ सुकेश तडवी, पोकॉ सचिन जाधव, समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील या सर्व टीमने आरोपी अटक करण्यासाठी मेहनत घेतली.
जनतेला सतर्कतेचा इशारा
शहरातील नागरिकांनी रात्रीचे सुरक्षा उपाय योग्यरित्या करावेत आणि संशयित हालचाली दिसल्यास पोलिसांना तातडीने कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


